बीकेसीमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान 400 टनांची क्रेन उलटली; सुदैवाने जीवितहानी नाही, कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मेट्रो लाईन 2 बी चे बांधकाम सुरू असताना बुधवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. प्री-कास्ट बीम उचलत असताना 400 टन वजनाची एक मोबाईल क्रेन अचानक उलटली आणि गर्डर खाली कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#पाहा | मुंबई: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी एक मोठा अपघात झाला असून, खांबावर उचलत असताना संपूर्ण बीम कोसळला आहे. यादरम्यान बीम लावण्यासाठी वापरण्यात आलेली मोबाईल क्रेनही उलटली.
(घटनास्थळावरील पहाटेचे दृश्य… pic.twitter.com/h12rWEf9R4
— ANI (@ANI) 15 एप्रिल 2026
Comments are closed.