Mumbai News – पैशांच्या वादातून नागपाड्यात धारदार शस्त्राने वृद्धाची हत्या; आरोपीला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पैशांच्या वादातून मुंबईतील नागपाडा परिसरात वृद्ध नागरिकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद इक्बाल इब्राहिम सेलीया असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीने केलेल्या फिर्यादीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सादिक आकिब जवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नागपाड्यातील मदनपुरा येथील करीम परदा मॅन्शनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद इक्बाल इब्राहिम सेलीया यांच्याकडे आरोपीने 65 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या मासिक परताव्यावरून सोमवारी सायंकाळी पीडित आणि आरोपीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने वृद्ध व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात सेलीया यांच्या मान, छाती, पोट आणि हातांवर अनेक गंभीर जखमा झाल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.