Mumbai News – पश्चिम द्रुतगती मार्गावर अग्नीतांडव, मुंबईहून उज्जैनला जाणाऱ्या खासगी बसला भीषण आग

मुंबईहून उज्जैनला जाणाऱ्या खासगी बसला पश्चिम द्रुतगती मार्गावर भीषण आग लागल्याची घटना घडली. मालाड येथे मंगळवारी सकाळी 9.30 वाजता ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. आग लागल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

आग लागल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही कळ विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Comments are closed.