Mumbai News – NEET UG परीक्षेसाठी रविवारऐवजी शनिवारी मध्यरात्री घेणार मेगाब्लॉक
येत्या रविवारी 3 मे 2026 रोजी NEET UG 2026 परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिवसा मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. तथापि, विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान मेन लाईनवर तसेच ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री मेगा ब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर रात्री 00.05 ते पहाटे 05.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 23.30 ते पहाटे 04.47 पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहारपर्यंत डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील तसेच पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
घाटकोपर येथून रात्री 23.29 ते पहाटे 05.04 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
ब्लॉकपूर्वी डाउन मार्गावरील शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते टिटवाळा ही रात्री 23.16 वाजता सुटणारी असेल. ब्लॉकपूर्वी अप मार्गावरील शेवटची उपनगरी ट्रेन टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही कल्याण येथून रात्री 22.22 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर डाउन मार्गावरील पहिली उपनगरी ट्रेन N5 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा ही पहाटे 05.07 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर अप मार्गावरील पहिली लोकल TL2 टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही कल्याण येथून पहाटे 04.12 वाजता सुटेल.
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप व डाउन मार्गांवर रात्री 23.45 ते पहाटे 04.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप व डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून रात्री 23.32 ते 00.05 दरम्यान सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील. पनवेल/नेरुळ/वाशी येथून रात्री 23.09 ते 23.15 दरम्यान सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप सेवा रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी डाउन मार्गावरील ठाणे ते पनवेल शेवटची ट्रेन रात्री 23.14 वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वी अप मार्गावरील वाशी ते ठाणे शेवटची ट्रेन ही रात्री 22.45 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर डाउन मार्गावरील पहिली उपनगरी ट्रेन ठाणे ते पनवेल पहाटे 05.12 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर अप मार्गावरील पहिली उपनगरी ट्रेन पनवेल ते ठाणे पहाटे 04.33 वाजता सुटेल.
Comments are closed.