Mumbai News – रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी 9 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवरील कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे.
माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.36 वाजल्यापासून ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर साधारणतः 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी 11.03 वाजल्यापासून ते दुपारी 3.38 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर साधारणतः 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ब्लॉक राहील. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-कुर्ला तसेच पनवेल-वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील. तसेच ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे–वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

Comments are closed.