Mega Block – मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होणार

अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होतील. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. दरम्यान, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नाही.
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान मुख्य मार्गावरील उपनगरीय सेक्शन्सवरील 5व्या आणि 6व्या मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक परिचालीत करण्यात येत आहे.
मेगाब्लॉकमुळे काही अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा वळवल्या जातील. सर्व एक्सप्रेस गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.
अप मेल-एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
- 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
- 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
- 13201 पाटणा – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस
- १७२२१ काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12126पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
- 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस
- 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
- 12168 बनारस – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- 12812 हाटिया – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 11012धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
- 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर गोडान एक्सप्रेस
- 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस
- 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
- 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/बांद्रा डाउन हार्बर मार्गवर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/ बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक राहील.
Comments are closed.