‘ये जिंदगी उसी की हैं’…, सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांना सुरेल आदरांजली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्रन यांना सुरेल आदरांजली वाहण्यासाठी खास मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘ये जिंदगी उसी की हैं’ या खास मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. विले पार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे शुक्रवारी 6 मार्च 2026 रोजी रात्री 8.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या भावस्पर्शी संगीताने सी. रामचंद्र यांनी हिंदुस्थानी संगीतविश्वाला अनेक सुवर्णक्षण दिले. सी. रामचंद्र यांच्या गाजलेल्या गीतांचा सुरेल प्रवास अनुभवी गायक-वादकांच्या सादरीकरणातून या मैफलीत उलगडणार आहे.

Comments are closed.