Mumbai News – बंद दरवाजांची नॉन-एसी लोकल अखेर कुर्ला कारशेडमध्ये दाखल
पहिली बंद दरवाजाची नॉन-एसी लोकल अखेर मध्य रेल्वेवरील कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. गर्दीमुळे प्रवाशांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी बंद दरवाजाची नॉन-एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज झाली आहे. बंद दरवाजांची ही देशातील पहिली नॉन-एसी लोकल असून मुंबईत दाखल झाली आहे.
जून 2025 मध्ये गर्दीमुळे लोकलमधून पडून मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाय म्हणून स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकल सुरू करण्यात येणार आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये या लोकलची चाचणी कुर्ला कारशेडमध्ये घेण्यात आली.
चेन्नईतील पेरांबूरस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही लोकल तयार करण्यात आली आहे. 268201-268212 क्रमांक असलेली ही 12 डब्यांची आधुनिक ट्रेन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुसज्ज आहे. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण या स्थानकांवर चालवली जाण्याची शक्यता आहे.
Comments are closed.