Mumbai News – दादरमध्ये बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये धडक, अपघातात एकाचा मृत्यू; चार जखमी

बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर चार पादचारी जखमी झाल्याची घटना मुंबईतील दादर परिसरात घडली. दादरमधील प्लाझा बस स्टॉपजवळ रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. जखमींमध्ये तीन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेस्ट बस वरळीहून सायन प्रतिक्षा नगरकडे जात असतानाच प्लाझा बस स्टॉपजवळ दादरहून येणाऱ्या भरधाव टेम्पोने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस डाव्या बाजूला प्लाझा बस स्टॉपकडे घुसली आणि बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवासी, पादचाऱ्यांना धडकली. यात एकाचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहाबुद्दीन (37) असे मयताचे नाव आहे. तर राहुल अशोक पाडळे (30), रोहित अशोक पाडळे (33), अक्षय अशोक पाडळे (25) आणि विद्या राहुल मोटे (28) अशी जखमींची नावे आहेत. शिवाजी पार्क पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Comments are closed.