Mumbai News – मुंबई विमानतळावर 6 कोटी रुपयांचा गांजा जप्त, एका प्रवाशाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. एअर इंटेलिजेंस युनिटने ही कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्य असलेले 6,006 ग्रॅम गांजा हस्तगत करत एका प्रवाशाला अटक केली. कैस शेख असे अटक आरोपीचे नाव आहे.

कैस शेख हा बँकॉकहून व्हिएतजेट एअरलाइन्सच्या विमानाने पहाटे 1.15 च्या सुमारास विमानतळावर उतरला. यावेळी एअर इंटेलिजेंस युनिटने गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. शेखच्या स्कायबॅग्ज ट्रॉलीची तपासणी केली असता आत दोन कापडी पिशव्यांमध्ये लपवलेले 12 प्लास्टिकचे पॅकेट आढळले. चाचणीत हा पदार्थ गांजा असल्याचे सिद्ध झाले.

सदर माल आपला असल्याचे शेखने कबूल केले. त्याला एनडीपीएस कायदा, 1985 च्या अनेक कलमांखाली अटक करण्यात आली. या तस्करीमध्ये आणखी काही लोकांचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Comments are closed.