NEET UG च्या परीक्षार्थीना दिलासा; मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशभरात रविवारी नीट यूजी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवासास अडथळा होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने रविवारी नियोजित असलेला मेगाब्लॉक रद्द केला आहे. यामुळे नीट परीक्षार्थींना मोठा दिला मिळाला आहे.

नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी मध्य रेल्वेवरील सर्व 1,820 लोकल फेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. तसेच, 21 जून 2026 रोजी मध्य रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ नसेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पेपरफुटीमुळे गेल्या महिन्यात झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन एनटीएने केले आहे.

Comments are closed.