संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाच्या प्रकाशनाचे दिले निमंत्रण

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन 17 मे रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. त्या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण त्यांनी यावेळी शरद पवार यांना दिले.

संजय राऊत आणि शरद पवार यांची यावेळी राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर चर्चाही झाली. त्याचप्रमाणे रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावरही उभय नेत्यांची चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी खासदार राऊत यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. शरद पवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आलेले अनुभव ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात मांडले आहेत. प्रकाशन समारंभाच्या निमंत्रणाबरोबरच संजय राऊत यांनी त्या पुस्तकाची प्रतही शरद पवार यांना दिली.

Comments are closed.