Mumbai News – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन, अनेक विमानांची उड्डाणे उशिराने

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाले आहे. यामुळे विमानतळावर चेक इन आणि बोर्डिंग प्रोसेस मॅन्युअल पद्धतीने होत आहे. यामुळे अनेक विमानांची उड्डाणेही उशिराने सुरू आहेत. इंडिगो, एअर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना याचा फटका बसला आहे. सर्व्हर डाऊनमुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे.

Comments are closed.