सायन प्रतिक्षानगरमधील माला गार्डनमध्ये शेड कोसळली; दुर्घटनेत 5 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सायन पूर्व येथील प्रतिक्षा नगरमधील गार्डनमधील शेड कोसळून पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धोंडीराम घोपकर (65), गणपत आंबोले, (79), प्रमिला जाधव (68), लक्ष्मी शितलिया (65) आणि सुनीता मोरे (64) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचे कळते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि बीएमसीच्या वॉर्ड गार्डन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचावकार्य आणि इतर आपत्कालीन उपाययोजना सुरू आहेत.

Comments are closed.