शीव स्थानकाजवळील भुयारी मार्ग खुला
शीव स्टेशनजवळील भुयारी मार्गाचे शुक्रवारी दिमाखात लोकार्पण करण्यात आले. शीव रेल्वे स्थानकातून थेट धारावी आणि एलबीएस मार्गाला जोडणाऱया या भुयारी मार्गामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. धारावी ही कुंभारवाडा आणि तिथल्या माती कलेसाठी ओळखली जाते. या सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासाठी भुयारी मार्गामध्ये आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत.
शीव स्टेशनजवळील या भुयारी मार्गाचे लोकार्पण विभागप्रमुख -आमदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी धारावी विधानसभेतील विभाग संघटक विठ्ठल पवार, विधानसभा समन्वयक सुरेश सावंत, नगरसेवक – उपविभागप्रमुख जोसेफ कोळी, नगरसेविका अर्चना शिंदे, शाखाप्रमुख सतीश कटके, किरण काळे, आनंद भोसले, मुत्तू पट्टन तेवर, युवासेना विभाग अधिकारी सनी शिंदे, सतीश सोनवणे, विधानसभा प्रमुख माया जाधव, समन्वयक कविता भागणे, उपविभाग प्रमुख देवयानी कोळी, अश्विनी कोळी, शाखा संघटक अंजना आहिरे, उषा मोतीवाले, अनिता पोटे यांच्यासह शिवसैनिक, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.