Mumbai News – एलफिन्स्टन पूलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर मोठा ब्लॉक; प्रवाशांची रखडपट्टी होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एल्फिन्स्टन रोड रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजचे पॅनेल काढण्यासाठी विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करणार आहेत. या ब्लॉकमुळे सोमवार आणि मंगळवार दरम्यान रात्रीच्या वेळी लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. 30 मार्च रात्री 23.40 ते 31 मार्च पहाटे 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक काळात भायखळा ते दादर दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही धीम्या व जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील. तसेच रात्री 11:23 ते पहाटे 4:04 दरम्यानच्या सीएसएमटी-कुर्ला, सीएसएमटी-ठाणे, सीएसएमटी-अंबरनाथ आणि ठाणे-सीएसएमटी या लोकल फेऱ्या रद्द राहतील. तर डोंबिवली, कल्याण, खोपोली आणि बदलापूरहून येणाऱ्या अनेक लोकल कुर्ला, ठाणे किंवा दादर स्थानकावरच थांबवण्यात येतील.

ब्लॉक दरम्यान, सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या गाड्या भायखळा आणि दादर दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकावर थांबणार नाहीत. 31 मार्च रोजी पहाटे 00:12 ची सीएसएमटी-कर्जत लोकल सीएसएमटी ऐवजी दादरवरून 00:30 वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments are closed.