Mumbai News – कोस्टल रोडवर कारला भीषण आग, घटनेनंतर एक तास वाहतूक बंद

मुंबईच्या कोस्टल रोडवर गुरुवारी एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक एक तास बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
ताडदेवजवळील कोस्टल रोडच्या दक्षिणेकडील बोगद्यात कारला आग लागल्याने दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील दोन्ही लेन तात्पुरते बंद करण्यात आल्या होत्या. आगीच्या घटनेनंतर, कोस्टल रोडवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी हाजी अली आणि वरळी कनेक्टरवर वाहतूक वळवण्यात आली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Comments are closed.