Mumbai News – भांडुप स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भांडुप स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने गुरुवारी सकाळी मध्य रेल्वेवरील सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 48 मिनिटे विस्कळीत झाली. सकाळी 7.47 च्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाला. त्यानंतर 8.35 पर्यंत ही बिघाड कायम होता. यामुळे सर्व अप लोकल ए मार्करच्या आधारे पुढे सोडण्यात आल्या.

ऐन कार्यालयीन वेळेत हा बिघाड झाल्याने नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी फुलली. लोकल उशिरा धावत असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहचायला उशीर झाला. अखेर 48 मिनिटांनी सिग्नलमधील बिघाड दुरुस्त झाला आणि वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

Comments are closed.