आता एसटीचा ठावठिकाणा कळणार! परिवहन विभागाकडून ‘आपली एसटी’ अ‍ॅप सुरू

सेंट बस

बेस्ट बसेसप्रमाणे आता एसटीचाही ठावठिकाणा प्रवाशांना कळणार आहे. परिवहन विभागाने ‘आपली एसटी’ हे नवीन अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेत आणले आहे. यामुळे प्रवाशांना आता एसटी थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही. 12 हजारपेक्षा जास्त बसेस आणि राज्यभरातील 1 लाख पेक्षा जास्त मार्गांचे मॅपिंग करून हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे प्रवाशांना आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळेल. प्रवासी माहिती केंद्राद्वारे (‘Passenger Information System’ ) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही तर, ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील.

एसटीची 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द, टीकेची झोड उठताच  24 तासांत सरकारला उपरती

अ‍ॅपमध्ये अँड्रॉइड आणि अ‍ॅपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा (फीचर्स ) उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बस लाईव्ह ट्रॅकिंग करणे यांचा समावेश आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली आहे. एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.

‘कवच’ प्रणालीमुळे रेल्वेची धडक टळणार, मध्य रेल्वेने रचला इतिहास; लोको चाचण्या केल्या पूर्ण

Comments are closed.