एमएमबीएआय न्यूज – दोन दहशतवादी अटक, निया ग्रास

आयसिसशी संबंधित दोन दहशतवाद्यांना एआयएने मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना इमिग्रेशन ब्युरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 वरून दोघांना अटक केल्याचे एनआयएने सांगितले. अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरातील स्लीपर मॉड्युल प्रकरणात या दोघांचा थेट सहभाग होता.

दोघा दहशतवाद्यांविरोधात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दोघेही दोन वर्षांपासून फरार होते. एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. फरार दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 3-3 लाख रुपयांचे बक्षिस एनआयएने घोषित केले होते.

या दोघांसह आधीच अटक केलेल्या इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे एनआयएने सांगितले. हे लोक पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्ला फयाज शेख याच्या नावाने भाड्याने घेतलेल्या घरामध्ये आयईडी तयार करत होते.

Comments are closed.