मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार; बाष्पीभवन, गळतीमुळे तलावांमधील पाणी आटलं

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. एकीकडे कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे याच कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी आटलं आहे. तलावांमधील पाण्याचं बाष्पीभवन आणि गळतीमुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्धा झाला आहे. म्हणून पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणे/तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. यातच अप्पर वैतरणात 1 लाख 63 हजार 299 दशलक्ष लिटर, ⁠मोडक सागरमध्ये 26 हजार 316 दशलक्ष लिटर, ⁠तानसात 66 हजार 612 दशलक्ष लिटर, ⁠मध्य वैतरणात 98 हजार 803 दशलक्ष लिटर, ⁠तुळशीत 4 हजार 535 दशलक्ष लिटर, ⁠भातसामध्ये 3 लाख 75 हजार 432 दशलक्ष लिटर आणि विहार 16 हजार 438 दशलक्ष लिटर पाणीसाठी शिल्लक आहे.

Comments are closed.