Mumbai News – काळ्या जादूच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या, मुलाला व्हिडिओ कॉल करत दाखवला आईचा मृतदेह

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पत्नी काळी जादू करत असल्याच्या संशयातून भंगार विक्रेत्या पतीने तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील धारावी परिसरात उघडकीस आली आहे. सूरजबेन अमृत सोलंकी असे मयत पत्नीचे तर अमृत मेघा सोलंकी असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने मुलाला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी धारावी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

धारावी कोळीवाड्यातील जांबा पास्कल चाळ येथे राहणाऱ्या अमृतचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी आणि चार मुलं आपल्यावर काळी जादू करत असल्याचा अमृतला संशय होता. याच संशयातून तो गेल्या तीन वर्षांपासून पत्नीचा मानसिक छळ करत असल्याचे मुलाने सांगितले. अखेर शुक्रवारी दुपारी अमृतने पाण्याची बाटली डोक्यात घालून आणि स्कार्फने गळा आवळून पत्नीची हत्या केली.

अमृतचा मुलगा दुपारी घरी आला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्याने वडिलांना फोन लावला. वडिलांनी व्हिडिओ कॉल करून मुलाला पत्नीच्या हत्येची माहिती देत मृतदेह दाखवला. आईचा मृतदेह पाहून मुलाने आरडाओरडा केला असता शेजारी धावले. यानंतर धारावी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. धारावी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याच्या कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करत अमृत सोलंकीला अटक केली.

Comments are closed.