Mumbai News – वांद्रे परिसरातील सरकारी कॉलनीत 16व्या मजल्यावरून महिलेची उडी, पोलीस तपास सुरू

मुंबईतील वांद्रे परिसरातील सरकारी कॉलनीत 16व्या मजल्यावरून एका महिलेने उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. महिला अपंग असून तिने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. महिलेचा पती मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असून घटनेवेळी घरीच उपस्थित होता.
घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. शारीरिक अपंगत्वामुळे तिला चालता येत नव्हते, ज्यामुळे तिला भावनिक त्रास झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. महिलेच्या पतीची सध्या चौकशी सुरू आहे.
Comments are closed.