Mumbai News – मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू

कफ परेड येथून रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मरीन ड्राईव्हच्या समुद्रात मृतदेह आढळून आला आहे. मनिता गुप्ता असे मयत तरुणीचे नाव आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिता दोन दिवसांपासून बेपत्ता होती. कफ परेड पोलीस ठाण्यात रविवारी मनिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. कालपासून पोलीस तिचा शोध घेत होते. सोमवारी तिचा मृतदेह मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनिताच्या चेहऱ्यावर जखमा आढळल्या आहेत. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाअंती ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत उलगडा होईल.
Comments are closed.