Mumbai News – माहिम खाडीत तरुणाची उडी, पोलीस आणि अग्नीशमन दलाकडून शोध सुरू
मुंबईतील माहिम खाडीत एका 22 वर्षीय तरुणाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. रफिक खान असे उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रफिकचा शोध सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रफिक खान हा वांद्रे येथील रहिवासी आहे. सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास रफिकने माहिमच्या खाडीत उडी घेतली. रफिकने उडी का घेतली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस आणि अग्नाशमन दल रफिकचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप रफिकचा शोध लागला नाही.
Comments are closed.