आईबापांनी लग्नात 50-60 लाख खर्च केले, 10 महिन्यांत लेकीने आयुष्य संपवलं, पंकजा मुंडेंच्या पीएच्या बायकोने का उचललं टोकाचं पाऊल?

मुंबई: भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (anant garje) यांच्या पत्नीने मुंबईतील घरात काल (शनिवारी, ता२२) टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

काल सायंकाळी सात वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसानी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.

वरळी बीडीडी येथे गौरी रहात होत्या, त्या केईएम रुग्णालय डेटिस विभागात कार्यरत होत्या. तर गेल्या अनेक दिवसांपासून घरात वाद सुरु होते, गौरी गर्जे यांना संशय होता नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत, यावरुन दोघांमध्ये भांडणं व्हायची, त्या मानसिक तणावात होत्या, केईएम रुग्णालयातील दंतवैद्यक विभागात त्या कार्यरत होत्या.

गौरी गर्जे यांच्या आत्महत्येवर अनंत गर्जे यांनी म्हटलं आहे की, घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. घाबरून ३१ व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी ३० व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतल्या अवस्थेत होती, गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी रुग्णालयात नेलं, असं अनंत गर्जे यांनी म्हटलं आहे.

तर गौरी पालवे यांच्या मामाने शिवदास गर्जे यांनी म्हटलं की, दोन महिन्यांपासून गौरी आणि त्याचे वाद सुरू होते. गौरीने त्याला माफ केलं होतं, मात्र त्याची चॅटींग सुरूच होती. त्याने हातावर वार केले आणि मी मरणार आणि तुलाही मारणार म्हणत होता,.

ती लढाऊ मुलगी होती, 50-60 लाख रूपये खर्चून तीच लग्न केलं. बीड मध्ये लग्न केलं, ८ महिने झालं, गौरी आई वडीलांना हे विषय सांगायची, गौरीच्या वडीलांकडे चॅटींगचे पुरावे आहेत, तो म्हणतो की गळफास केला, गळफास घेत होती मग थांबवलं नाही, तो फरार आहे.

त्याचे वडील हसू लागले आहेत, कुणीही तिथे थांबलं नाही. जर तीने आत्महत्या केली तर मग हे पळाले का? पंकजा ताईला ह्या विषयी काही माहिती नाही, पंकजाताई नालायक लोकांना सांभाळत नाहीत. ताईचा ह्या विषयात काहीही दोष नाही, ह्या हत्येची CBI चौकशी करून न्याय द्यावा, असंही गौरी पालवेच्या मामांनी म्हटलं आहे.

तर ह्यानेच हत्या केली आहे, दवाखान्यात नेलं ह्यानेच, गौरीने आत्महत्या केली नाही, हत्या झाली आहे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, शिंदे साहेबांकडे आम्ही विनंती करतो की ह्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी, गौरीची आत्महत्या नसून हत्या झाली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

येथे प्रकाशित : 23 नोव्हेंबर 2025 12:03 PM (IST)

मुंबई फोटो गॅलरी

आणखी पाहा

Comments are closed.