मुंबई पोलिसांना मालकी हक्काच्या घरांसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, निवडणूक आचारसंहितेतही निर्णय

मुंबई पोलिसांना पोलीस वसाहतीतील घरे मालकी हक्काने घरे देता येतील किंवा कसे याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. घरकुल योजनेच्या अंतर्गत पोलिसांना घरे देण्याचा निर्णय घेण्यासाठी ही समिती कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक बाबींची तपासणी करणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने मुंबई शहरात पोलिसांना मालकी हक्काचे घर देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या समितीत सदस्य म्हणून सामान्य प्रशासन, वित्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस महासंचालक कार्यालयाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त (प्रशासन) यांचा समावेश आहे. तर गृह विभागाचे मंत्रालयातील उपसचिव अथवा सहसचिव हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

Comments are closed.