गोहिलच्या गोलंदाजीमुळे मुंबई पोलीस जिमखान्याचा विजय

पोलीस आयुक्तालय मुंबई आणि पोलीस ढाल समितीतर्फे संयुक्तपणे आयोजित 78 व्या पोलीस निमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धेत रंगतदार लढतीत मुंबई पोलीस जिमखाना संघाने यूपीएल इलेव्हनवर 7 धावांनी विजय मिळवला. विजय गोहिलने 6 विकेट घेत त्यात मोलाचा वाटा उचलला.
मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात रविवारी यूपीएल इलेवनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई पोलीस जिमखाना संघाला 37.1 षटकांत 156 धावांची मजल मारता आली. त्यांच्याकडून नदीम शेखने सर्वाधिक नाबाद 37 धावांची खेळी केली. यूपीएलकडून रोहित भेरे (4/36) आणि यश महालेने (4/51) प्रभावी मारा केला. प्रत्युत्तरादाखल विजय गोहिलसह (27 धावांत 6 विकेट) अमोल तनपुरेच्या (3 विकेट) गोलंदाजीसमोर यूपीएल स्पॉन्सर इलेव्हनचा डाव 149 धावांवर आटोपला. त्यांच्याकडून खिजर दाफेदार (49) आणि रोहन तांबेने (45) चांगला प्रतिकार केला.
संक्षिप्त धावफलक – पय्याडे स्पोर्ट्स क्लब ः 34 षटकांत सर्वबाद 110 (दशरथ चावा-4/16) वि. शिवाजी पार्क जिमखाना ः 37.2 षटकांत 3 बाद 111 (पराग जाधव 38 ना. रझा मिर्झा 37). डॉ. डी. वाय. पाटील एस.ए. ः 53.1 षटकांत सर्वबाद 265 (रणजित निकम 99, प्रणय केला 40; मैराज खान 5/65) वि. पारसी जिमखाना ः 48.2 षटकांत सर्वबाद 159 (ईशान मुलचंदानी 77; कार्श कोठारी 4/40, प्रशांत सोळंकी-3/28). मुंबई पोलीस जिमखाना ः 37.1 षटकांत सर्वबाद 156 (नदीम शेख ना. 37 ; रोहित भेरे 4/36, यश महाले-4/51) वि. यूपीएल इलेव्हन ः 41 षटकांत सर्वबाद 149 (खिजर दाफेदार 49, रोहन तांबे 45; विजय गोहिल-6/27, अमोल तनपुरे-3/50). एमसीए कोल्ट्स ः 28.1 षटकांत सर्वबाद 120 (अर्जुन दाणी 36, मकरंद पाटील 34; जितेंद्र पालीवाल 5/29, यश पांचाल 3/45) वि. न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब – 26.5 षटकांत 7 बाद 121 (कुश कारिया 35; अर्जुन दाणी 3/34). क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ः 70 षटकांत 6 बाद 314 (चिन्मय सुतार ना. 149, सौरभ सिंग 44; सक्षम पराशर 3/66) वि. मुंबई जिमखाना ः 30.5 षटकांत सर्वबाद 115 (भैया कुमार 42; कार्तिक मिश्रा-4/28, ध्रुमिल मटकर 4/67). न्यू हिंदू क्रिकेट क्लब ः 69.4 षटकांत सर्वबाद 398 (प्रसाद पवार 223 , गौरव जठार 54, आयुष जेठवा 51; कृतिक हनगावडी 5/114) वि. नॅशनल क्रिकेट क्लब ः 25.5 षटकांत सर्वबाद 125 (साईराज पाटील 35, सोहम बेंडे 30; दीपक शेट्टी 4/53, श्रेयस गुरव 3/43).
Comments are closed.