खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
सलग सुट्टय़ांमुळे नाताळ आणि थर्टी फर्स्ट एन्जॉय करण्यासाठी लोणावळा, खंडाळा, पुणे, कोल्हापूर-कोकणाकडे एकाच वेळी लाखो मुंबईकर बुधवारी कुटुंबकबिला आणि मित्रांसह कारने सुसाट निघाले. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रोजच्यापेक्षा चौपट वाहनांची गर्दी झाली. खंडाळय़ाजवळ अमृतांजन ब्रिज आणि अंडा पॉइंटवर बॉटल नेकमुळे गाडय़ांची काsंडी होऊन वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. त्यातच लायनर गरम होऊन निकामी झाल्याने 25 ते 30 गाडय़ा जागोजागी बंद पडल्या. पुणे लेनवर गाडय़ांची पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांग लागली होती. त्यामुळे प्रवाशांच्या डोसक्याला आणखीनच ताप झाला. खंडाळय़ात खोळंबा झाला आणि नाताळच्या सुट्टीचे बारा वाजले. या वेळी बोर घाट वाहतूक पोलिसांनी विशेष ब्लॉक घेऊन ही वाहतूक काsंडी सोडवली. पण सायंकाळी सहा वाजेपर्यंत बोर घाटात मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक मुंगीच्या पावलानेच पुढे सरकत होती.
Comments are closed.