Mumbai Rain – गरज असेल तरच घराबाहेर पडा! पुढील 2 तास मुंबईसाठी महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गेले दोन दिवस पावसाने थोडी उघडीप दिली होती. मात्र शनिवारपासून पुन्हा एकदा मुंबईत पावसाचे धुमशान सुरू होत आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबईसाठी पुढील दोन तास महत्त्वाचे आहेत.
मुंबई शहर, उपनगरातील आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली असून पुढील दोन तासात महत्त्वाचे आहेत. मुंबई, नवीन मुंबई आणि मध्य मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.
#मम्बैरैन सकाळी 7:30 वाजता अद्यतनित करा: मुंबई सिटी, नवी मुंबई आणि सेंट्रल मुंबई पुढील 1-2 तासांमधून अपेक्षित अत्यंत तीव्र पाऊस पडला.
घराबाहेर जाण्याचे काम करू नका कारण हे रेन बँड खूप मोठे आहेत, 60 मिमी/ताशी+ वेगात. pic.twitter.com/ggrgysy7o2z– मुंबई पाऊस (@rushiikesh_agre_) 27 सप्टेंबर, 2025
Comments are closed.