खटला रखडत असेल तर आरोपीला तुरुंगात ठेवता येणार नाही, सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फौजदारी खटल्यांच्या रखडपट्टीमुळे वर्षानुवर्षे तुरुंगात राहणाऱ्या कच्च्या कैद्यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जर फौजदारी खटला प्रभावीपणे चालत नसेल तर त्या प्रकरणातील आरोपीला बेभरवशी काळासाठी तुरुंगात डांबता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आणि बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटमधील आरोपीला जामीन मंजूर केला.

जानेवारी 2025 मध्ये भायखळ्यात पोलिसांनी बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यातील आरोपी उमरान बलबले याने जामिनासाठी अ‍ॅड. गणेश नागरगोजे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल साळुंखे यांनी निर्णय दिला. बनावट नोटांच्या रॅकेटच्या तपासाची संपूर्ण कागदपत्रे बारकाईने तपासली. त्या कागदपत्रांवरून अर्जदार आरोपीचा बनावट नोटा तयार करण्यात सहभाग असल्याचे कुठेही दिसून येत नाही. तसेच या गुह्याचा खटला प्रभावीपणे चालत नाही. अशा स्थितीत आरोपीला बेभरवशी काळ तुरुंगात डांबता येणार नाही. आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे कायद्याच्या नजरेत योग्य ठरणारे नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी बलबलेला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले.

Comments are closed.