बाप्पा पावला! शेअर बाजार उसळला!!

अमेरिकन फेडरलच्या व्याजदरात कपात होऊ शकते, या आशेवर सोमवारी शेअर बाजार उसळल्याचे दिसले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 329 अंकांनी वधारून 81,635 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 97 अंकांनी वाढून 24,967 अंकांवर बंद झाला. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, सन फार्मा, मारुती आणि टायटनचे शेअर्स वाढले तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली. सप्टेंबरमध्ये फेडरलच्या व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता असल्याने बाजारात अच्छे दिन पाहायला मिळत आहे.

Comments are closed.