मुंबई ते अयोध्या ‘अमृत भारत’ रेकद्वारे 24 विशेष गाड्या
मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि अयोध्यादरम्यान 24 साप्ताहिक गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाडय़ा ‘अमृत भारत’ रेकद्वारे चालवल्या जाणार आहेत. एलटीटी- अयोध्या कैंट- एलटीटी सुपरफास्ट विशेष गाड्यांच्या 24 फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक 01045 ही साप्ताहिक विशेष गाडी दर सोमवारी आणि शुक्रवारी 19 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत एलटीटी येथून सकाळी 7.35 वाजता सुटेल आणि अयोध्या कैंट येथे दुसऱ्या दिवशी 10.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 010466 ही विशेष गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी 20 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत अयोध्या कैंट येथून दुपारी 1.50 वाजता सुटेल.
Comments are closed.