Mumbai to Konkan Travel will be comfortable, Nitesh Rane announces to start M2M boat for Ganeshotsav


मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. ज्यामुळे चाकरमान्यांना अवघ्या साडेचार तासांमध्ये मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे.

मुंबई : कोकणातील गणेशोत्सव हा सर्व चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता चार महिने आधीपासूनच रेल्वेची बुकिंग करण्यात येत असते. पण यंदाच्या वर्षापासून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास खूपच सुखकर होणार आहे. कारण आता चाकरमान्यांना समुद्रामार्गे कोकणात जाता येणार आहे. लवकरच कोकणात जाण्यासाठी एम टू एम ही हायटेक यंत्रणा असलेली बोट प्रवासांच्या सेवेत येणार आहे. याबाबतची घोषणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठीच मंत्री नितेश राणे यांनी हा पुढाकार घेतला आहे. (Mumbai to Konkan Travel will be comfortable, Nitesh Rane announces to start M2M boat for Ganeshotsav)

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. ज्यामुळे चाकरमान्यांना अवघ्या साडेचार तासांमध्ये मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत कोकणातील हा प्रवास आणखीनच सुखकर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चाकरमन्यांसाठी ही आनंदाची बातमी असून दरवर्षी होणाऱ्या प्रवासासंदर्भातील त्रासापासून काही अंशी सुटका होणार आहे. येत्या 25 मे रोजी मुंबईतील भाऊचा धक्का येथे एम टू एम ही यंत्रणांनी सुसज्ज असलेली बोट पोहोचणार आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.

हेही वाचा… Sanjay Raut : परदेशात जाणारे शिष्टमंडळ म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संजय राऊतांचे टीकास्त्र

गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना अनेक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवास यामुळे अनेक लोक कोकणात जाणे टाळतात. पण हा त्रास नेहमीचाच झाला असल्याने अनेक चाकरमानी काहीही करून कोकणात पोहोचतात. पण आता लवकरच या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास हा सुखकर तर होईलच पण त्याचसोबत तो जलद सुद्धा होणार आहे.



Source link

Comments are closed.