मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंना निवास सुविधा मिळणार

मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंना निवासाची दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून मुंबई विद्यापीठ युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल शेठ, शशिकांत झोरे तसेच माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची भेट घेतली आणि नाईक यांनीही त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुंबई विद्यापीठाचा खेळ विभाग राष्ट्रीय स्तरावर सुमारे 37 क्रीडा प्रकारांत आपला सहभाग नोंदवतो. अनेक सांघिक खेळांचे सराव शिबीर वानखेडे स्टेडियमलगत असलेल्या स्पोर्ट्स पॅव्हेलियन मैदानावर होतात. या संघांमध्ये मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील खेळाडूंचा समावेश असतो. खेळाडूंना दर्जेदार निवास सुविधा मिळाव्यात, अशी मागणी या प्रतिनिधींनी अध्यक्ष नाईक यांच्याकडे केली. याला एमसीएकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

Comments are closed.