Mumbai vada pav likely to become more expensive by Rs 2 to 3 due to bakery operators rrp


सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग, आवडीचा पदार्श आणि गरिबांचा घास म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबईचा वडापाव 24 डिसेंबरपासून महागणार असल्याची शक्यता आहे. पावाचे दर येत्या 24 डिसेंबरपासून वाढत आहेत. त्यामुळे वडापावच्या किंमतीमध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग, आवडीचा पदार्श आणि गरिबांचा घास म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबईचा वडापाव 24 डिसेंबरपासून महागणार असल्याची शक्यता आहे. पावाचे दर येत्या 24 डिसेंबरपासून वाढत आहेत. त्यामुळे वडापावच्या किंमतीमध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. (Mumbai vada pav likely to become more expensive by Rs 2 to 3 due to bakery operators)

दररोज अनेक लोक वेगवेगळ्या शहरातून आणि राज्यातून मुंबईत कामानिमित्त येत असतात. हे लोक चांगलं काम मिळेपर्यंत वडापाव खाऊन आपला दिवस काढतात. मात्र आता बदलापूर बेकरी असोसिएशनने 24 डिसेंबरपासून पावाचे दर वाढण्याचा निर्णय घेतला आहे. तेल कांद्यापाठेपाठ आता पावही महागणार असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. वडापाव 1 ते 2 रुपयांनी महाग होऊ शकतो, अशी माहिती वडापाव विक्रेत्यांकडून देण्यात येत आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Passing Policy : 5 वी आणि 8 वीत नापास झालात तर…; केंद्रीय शिक्षण विभागाने बदलले नियम

कुळगाव-बदलापूर बेकरी असोसिएशनने बदलापूरमध्ये पावाच्या एका लादीमागे 3 रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी तेल, कांदा, बटाटा आणि इतर किराणामालाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या दरात वडापाव विकणे परवडत नाही. वडापावच्या दरात 1 ते 2 रुपयांनी वाढ करावी लागू शकते, असं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, सध्या वडापावसाठी 15 रुपये खर्च येतो. मात्र आता वाढ झाल्यानंतर एका वडापावसाठी 16 ते 17 रुपये मोजावे लागू शकतात.

– Advertisement –

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

दरम्यान, 2023 पर्यंत पावासाठी लागणाऱ्या मैद्याचे 50 किलोचे पोते 1200 ते 1400 रुपये किंमतीला मिळत होते. मात्र आता 50 किलोचे पोते 1600 रुपये झाले आहे. तसेच पावाच्या भट्टीसाठी लागणाऱ्या इतर सामानाच्या किंमतीदेखील गेल्या काही काळापासून वाढल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वच स्तराला बसला आहे. त्यामुळे सध्या बाजारात कांदे 75-83 रुपये प्रती किलोवर विकले जात आहे. कांद्याच्या किंमती वाढल्याने नागरिकांच्या खिशाला आधीच फटका बसला आहे. त्यातच आता वडापावच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना वडापावसाठी अधिकचे पैसे मोगावे लागणार आहे.

हेही वाचा – Shiv Sena Shinde : नाराजीचा नवा अंक; बंगले वाटपात भाजप मंत्र्यांना झुकते माप; शिवसेना मंत्र्यांना फ्लॅट


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.