Mumbai news – येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या विकृत तरुणाला मुंबईकरांनी रंगेहात पकडलं; चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं
मुंबईतील खार सबवेजवळ येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करणाऱ्या विकृताला सतर्क नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. तरुणाला रंगेहात पकडत आधी चोप देण्यात आला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वराह वॉरिअर नावाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ माझ्या समोर घडलेल्या एका खऱ्या घटनेचा आहे. मी एका रस्त्याने (खार सबवे) चालत होतो आणि तिथे एक यूपी माणूस (जो कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झाला होता) रस्त्याच्या कडेला हातात फोन घेऊन काहीतरी रेकॉर्ड करत असल्यासारखा उभा होता.
हा स्वस्त माणूस व्हिडिओ काढत होता… pic.twitter.com/1QxHhNdQRc
— वराहा वॉरियर (@VarahaWarrior) 7 मार्च 2026
Comments are closed.