Mumbai’s Aarti was made homeless by her boyfriend; she found shelter in Nashik; she stayed with her baby at Nashik Road railway station for 10 days
फेसबुकवरून मैत्री झालेल्या युवकाशी मोठ्या विश्वासाने मुंबईतील एका युवतीने लग्न केले. मात्र, तो मद्यपी असून त्याचे आधीच लग्न झाल्याचे तिला उशीरा समजले. त्यातून दोघांमध्ये घटके उडाले. राग अनावर झाल्याने प्रियकर पतीने तिला तान्ह्याबाळासह घराबाहेर काढले. असुरक्षित वातावरणात एकाकी पडल्याने तिच्या डोळ्यासमोर अंधार होता. अशा अवस्थेत ती रेल्वेने मुंबईहून मनमाड व नाशिकरोड रेल्वे स्टेशनला आली. रेल्वे स्टेशनवर ती १८ दिवस राहिली मात्र, तिला कुणी आधार दिला नाही. मात्र, रामकुंड परिसरातील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र तिच्यासाठी आशेचा किरण ठरला. या केंद्रामुळे तिच्या आयुष्याला पुन्हा दिशा मिळाली. (Mumbai’s Aarti was made homeless by her boyfriend; she found shelter in Nashik; she stayed with her baby at Nashik Road railway station for 10 days)
३६ वर्षीय आरती आणि राकेश (नाव बदलेले)ची ओळख फेसबुकवर झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री झाले. दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ही बाब तिच्या कुटुंबियांनी समजली. राकेशसोबत तिने लग्न करू नये, असे मत तिच्या कुटुंबियांचे होते. तरीही, आरती राकेश किती चांगला आहे, तो फसवणार नाही, असे कुटुंबियांना पटवून सांगितले. त्यातून तिचा आणि कुटुंबियांमधील दुरावा वाढत गेला. ही संधी साधत राकेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. राकेशने तिला लग्नाची मागणी घातली. त्यास तिने होकार दिला. दोघांनी ओळखीच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. तिचे लग्नाचे सुरुवातीचे दिवस आनंदाचे गेले. मात्र, राकेशने तिला स्वत:चे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली.
राकेश दारू पिवून घरी येऊ लागला. त्यातून दोघांमध्ये वाद सुरु झाले. दरम्यान, राकेशचे आधीच लग्न झाले असून, त्याला मुले असल्याचे समजले. त्यामुळे तिला मानसिक धक्का बसला. तिने राकेशला जाब विचारला. मात्र, झाले भलतेच. आता आपले पितळ उघडे पडल्याने त्याने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. माहेरी जावे तर तिला कुणीही घरात घेणार नव्हते. आगीतून फुफाट्यात अशीतिची अवस्था झाली. त्यामुळे ती त्रास सहन करत राहिली. मात्र, राकेशचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. त्याने तिला बाळासह घराबाहेर काढले. त्याचा छळ असह्य झाल्याने ती सव्वावर्षाच्या बाळासह मुंबईहून रेल्वेने मनमाडला आली. ती मनमाड रेल्वे स्टेशनवर आठ दिवस राहिली. त्यानंतर ती बाळासह १० दिवस नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात राहिली. दरम्यान, तिला एका महिलेकडून रामकुंड परिसरातील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्राची माहिती मिळाली. यशवंत लाकडे यांनी आरतीला माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्रात आधार दिला. या ठिकाणी तब्बल आठ महिने राहिली. दरम्यान, तिच्या प्रियकर पतीने माफी मागत तिला घेऊन जाण्यास होकार दिला. दोन दिवसांपूर्वी तिला पती मुंबईला घेऊन गेला.
आरतीला नाशिक सोडताना आश्रू अनावर
आरती सहा महिने रामकुंड परिसरातील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्रात राहिली. या ठिकाणी सर्व निराधारांची मोफत व्यवस्था केली. तिची सर्वोतोपरी यशवंत लाकडेंसह वयोवृद्ध पुरुष व महिलांनी काळजी घेतली. तिला हे केंद्र सोडताना आश्रू अनावर झाले होते. असुरक्षित वातावरणात आसरा मिळाल्याने तिने जाताना माहेर सोडून सासरी जाताना जसे वाटते, तसेच आता वाटत असल्याचे सांगितले. तिचे हे बोलणे ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणवले होते.
बेघर झालेल्या सपनाला माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्रामुळे आसरा मिळाल्याने तिच्या आयुष्याला दिशा मिळाली आणि तिचा संसार सावरला याचा आनंद आहे. तिची आणि बाळाची सर्वोतोपरी काळजी घेतली. तिला पतीसोबत सोडताना केंद्रातील पुरुष व महिलांना आश्रू अनावर झाले होते. ती आठवण आली की कॉल करत असते.
यशवंत लाकडे, संचालक, माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र, नाशिक
Comments are closed.