मुंब्रा बायपासवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडले

भरधाव कंटेनरने तीन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना आज दुपारी मुंब्रा बायपासवरील गावदेवी मंदिराजवळ घडली. या अपघातात हसन शेख (19), मोहिनउद्दीन शेख (19), अफजल शेख (22) या तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.
हसन, मोहिनउद्दीन आणि अफजल हे तिघेही दुचाकीवरून शिळफाट्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीला कंटेनरची धडक बसली. तिघेही दुचाकीवरून खाली कोसळले आणि कंटेनरच्या मागच्या चाकाखाली चिरडले गेले. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तिघांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
खड्ड्यांचा बळी
वसई : विरार पूर्वेतील खड्यांनी दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रताप नाईक (55) असे मृत्यू दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रताप हे विरारमधील रहिवासी असून आज सकाळी ते घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी निघाले होते. दरम्यान खड्ड्यात त्यांची गाडी आदळली. या धक्क्याने ते खाली कोसळले आणि मागून आलेल्या टँकरखाली चिरडले गेले.
Comments are closed.