महापालिका कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी पगार द्या! म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेची मागणी

राज्य सरकारच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी, कामगार, अधिकारी आणि कंत्राटी कामगारांना गणेशोत्सवापूर्वी पगार द्या, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे. याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र देण्यात आल्याचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.

यावर्षी गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणेशोत्सव  उत्साहाने साजरा करण्यामध्ये आर्थिक अडचण येऊ नये म्हणून राज्य सरकारने आपल्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांना 26 ऑगस्ट रोजी पगार देणार असल्याचे सांगत खूशखबर दिली आहे. याबाबत वित्त विभागाने शासन निर्णयही काढला आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनाही गणेशोत्सवापूर्वी पगार देण्याची मागणी करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना दर महिन्याचे वेतन पहिल्या तारखेला होते.

Comments are closed.