Municipal officials’ stick to the hearing


काठे गल्ली सिग्नललगत असलेल्या हजरत सय्यद सातपीर बाबा दर्ग्यासमोरील वाढीव अतिक्रमणप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य वक्फ न्यायाधिकरणामध्ये बुधवारी (दि.५) सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीला नाशिक महापालिका अधिकारी हजर राहिले नाहीत. त्यामुळे खंडपीठाने नाराजी व्यक्त करत पुढील सुनावणी १२ मार्च रोजी ठेवली आहे. (Municipal officials’ stick to the hearing)

हजरत सय्यद सातपीर बाबा दर्ग्यासमोरील वाढीव अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून २२ फेब्रुवारी रोजी हटिवण्यात आले. हे प्रकरण न्यायालयात असून, यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील राज्य वक्फ न्यायाधिकरणामध्ये २०२४ मध्ये मनाई आदेश पारीत केला आहे. या न्यायाधिकरणाने नाशिक महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे.
वक्फ न्यायाधिकरणामध्ये पहिली सुनावणी सोमवारी (दि.३) झाली होती. यावेळी न्यायाधिकरणाच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त कारवाईमध्ये सहभागी असलेल्या महापालिका अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाला बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र बुधवारी महापालिका प्रशासनाकडून कोणीही अधिकारी उपस्थित राहिले नाही. त्यांचे वकील पी. यू. वानकर यांनी सकाळच्या सत्रात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी खंडपीठाने जबाब नोंदविण्यास सांगितले असता त्यांनी वेळ मागितला. खंडपीठाने दुपारच्या सत्रात पुन्हा याबाबत सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले. दुपारी मात्र जबाब दाखल करण्यास कोणीही आले नाही. यामुळे खंडपीठाने नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनाला लेखी पत्र पाठविण्याचे आदेश देत आठवडाभरानंतर होणार्‍या सुनावणीला हजर राहून जबाब देण्याचे आदेश दिले आहेत.



Source link

Comments are closed.