बीडनंतर जळगाव हादरलं, माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या

बीड जिल्हय़ातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे वादळ अजून शमले नाही तोच जळगाव जिल्हय़ातील कानसवाडीचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची किरकोळ कारणावरून शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात आली.
युवराज कोळी हे आईवडिलांसोबत शेतात काम करत होते. मारेकऱयांनी युवराजवर वार करताच वडील सोपान कोळी आणि त्यांची आई मदतीसाठी धावली. मात्र या दोघांनाही पकडून ठेवण्यात आले आणि युवराज कोळी यांच्यावर वार करण्यात आले. आईवडिलांच्या डोळ्यादेखत मुलाची हत्या करण्यात आली. कोळी कुटुंब मदतीसाठी टाहो फोडत असल्याची दृश्ये समोर आली आहेत. भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील अशी आरोपींची नावे असून भरत पाटीलला अटक केली आहे.
Comments are closed.