ये जिंदगी उसी की है… संगीतकार सी. रामचंद्र यांना सांगीतिक आदरांजली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गीतांना उजाळा देणारी ‘ये जिंदगी उसी की है’ ही सांस्कृतिक मैफल विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना सुरेल आणि सुमधुर सांगीतिक मेजवानी देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन सुहास मुळ्ये, स्मृतीगंध संस्थेचे प्रतीक मेहता, अमित टिल्लू, आबासाहेब जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सुहास मुळ्ये यांनी सी. रामचंद्र यांच्या सांगीतिक आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात प्राजक्ता सातर्डेकर, जय आजगावकर, सौम्या वर्मा यांनी सी. रामचंद्र यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांनी तर निवेदन मंदार खराडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

Comments are closed.