मस्क बनणार जगातील पहिले ट्रिलियनेयर!
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले इलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनेयर बनण्यापासून अवघे काही पावले दूर आहेत. ‘फोर्ब्स’च्या ताज्या आकडेवारीनुसार, मस्क यांची फेब्रुवारी 2026 मध्ये एकूण संपत्ती 850 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ते लवकरच ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये पोहोचतील. असा रेकाॅर्ड करणारे ते जगातील पहिली व्यक्ती ठरतील. मस्क हे 2026च्या अखेरपर्यंत किंवा 2027 च्या सुरुवातीला 1 हजार अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक बनतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
2021 मध्ये मस्क यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर होती. 2024 च्या अखेरपर्यंत 400 अब्ज डॉलर, 2025 मध्ये त्यांनी 500, 600 आणि 700 अब्ज डॉलर पार केले. तर फेब्रुवारी 2026 मध्ये 850 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. मस्क यांची संपत्ती झपाटय़ाने वाढण्यामागे सर्वात मोठा वाटा हा स्पेसएक्स आणि एक्सएआयचा आहे. तसेच टेस्लामध्ये त्यांची जवळपास 12 टक्के भागीदारी आहे. मस्क यांच्या संपत्तीचा सर्वाच जास्त भाग हा शेअर्समध्ये आहे. स्पेस टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिक वाहन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स यासारख्या सेक्टरमुळे मस्क यांची संपत्ती वाढत आहे.
Comments are closed.