मस्क यांना झटका! संपत्ती 20.5 अब्ज डॉलरने घटली

जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत घसरण झाली. सर्वात मोठा फटका जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या इलॉन मस्क यांना बसला. टेस्लाच्या शेअर्समध्ये 6.64 टक्के घसरण झाल्यामुळे मस्क यांच्या नेटवर्थमध्ये 20.5 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती आता 430 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. मस्क यांच्या संपत्तीत आतापर्यंत 2.83 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. लॅरी एलिसन यांच्या नेटवर्थमध्ये 10.8 अब्ज डॉलरची घसरण झाली. 275 अब्ज डॉलरसोबत ते जगातील सर्वात मोठे दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी त्यांच्या नेटवर्थमध्ये आतापर्यंत 82.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जेफ बेजोस यांची संपत्ती 5.77 अब्ज डॉलरने कमी होऊन 259 अब्ज डॉलर झाली आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या नेटवर्थमध्ये 335 मिलियन डॉलरची वाढ झाली आहे.

टॉप 10 अब्जाधीश
एलोन मस्क – ४३० अब्ज डॉलर्स
लॅरी एलिसन – 275 बिलियन डॉलर
जेफ बेझोस – $259 अब्ज
लॅरी पेज – 242 बिलियन डॉलर
सर्जी ब्रिन – $226 अब्ज
मार्क झुकरबर्ग – 216 बिलियन डॉलर
बर्नार्ड अर्नॉल्ट – $202 अब्ज
स्टिव्ह वॉल्मर – 173 बिलियन डॉलर
जेन्सेन हाँग – 162 बिलियन डॉलर
वॉरेन बफे – $154 अब्ज

Comments are closed.