मलप्पुरममध्ये मुस्लिम लीगच्या कार्यालयावर हल्ला.

माकपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल

सर्कल/ मलप्पुरम

केरळच्या मलप्पुरममध्ये मुस्लीम लीगच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे. या हल्ल्याप्रकरणी माकपच्या 14  कार्यकर्त्यांवर गुन्हा नेंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. स्थानिक निवडणुकीत यूडीएफ आघाडीने यश मिळविले होते. या विजयानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान हा हल्ला झाला. माकप कार्यकर्त्यांनी मुस्लीम लीगच्या कार्यालयावर लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला, यामुळे इमारतीचे नुकसान झाले आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल युडीएफचे कार्यकर्तेही एकवटल्याने स्थिती तणावपूर्ण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला हटविले होते.

तर हल्ल्याच्या विरोधात मुस्लीम लीगने पेरिंथलमन्ना येथे बंद पुकारला होता, परंतु सोमवारी सकाळी लोकांना त्रास होणार असल्याचा दाखला देत हा बंद  मुस्लीम लीगने मागे घेतला होता. तर दुसरीकडे माकप नेत्यांनी युडीएफच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. माकपने निवडणुकीनंतर पराभवानंतर हिंसा फैलावली असुन हा प्रकार त्याची असहिष्णुता दर्शवित असल्याचा आरोप काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांनी केला आहे.

 

 

Comments are closed.