SIP : 5000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीतून 5 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? तज्ज्ञांनी महत्त्वाचं सूत्र सांगितलं
जागतिक अनिश्चितता, ट्रम्प टॅरिफ आणि विविध देशांमधील संघर्ष यामुळं भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षभरात तेजी आणि घसरणीचं वातावरण आहे.प्रामुख्यानं रिटेल गुंतवणूकदारांनी योग्य, आक्रमक धोरण राबवलं आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या पाच महिन्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होत आहे.

जर तुम्ही एसआयपी सुरु केली आणि त्यामध्ये दरवर्षी 10 टक्के स्टेपअप केल्यास मोठा फंड तयार होण्यात मदत होते. 5000 रुपयांची एससआयपी सुरु केलयानंतर 5 वर्ष गुंतवणूक सुरु ठेवल्यास आणि 12 टक्के सीएजीआर अपेक्षित ठेवल्यास 405518 रुपयांचा फंड तयार होईल. तर, यामुध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 300000 लाख रुपये असेल तर त्यावर मिळालेला रिर्न 105518 रुपये असेल.

5000 रुपयांची एसआयपी सुरु केल्यानंतर दरवर्षी 10 टक्के गुंतवणूक वाढवल्यास 5 वर्षात 484590 रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.यामध्ये गुंतवणूक म्हणून 366306 रुपये जमा होतील. तर, 12 टक्के सीएजीआर नुसार 118284 रुपये मिळतील.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकड्यांनुसार ऑगस्टमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात 33430 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जी जुलै च्या तुलनेत 22 टक्क्यांनी कमी होती. ज्याचं कारण न्यू फंड ऑफरमध्ये झालेली घसरण हे आहे. बीपीएन फिनकॅपचे संचालक एके निगम यांनी एसआयपी दीर्घकाळ सुरु ठेवल्यास फायदा होतो, असं सांगितलं. कम्पाऊंडिंग आणि रुपी कॉस्ट अवरेजिंगचा फायदा होतो, असं देखील तज्ज्ञ सांगतात.

ऑगस्ट महिन्यात SIP इन्फ्लो 28265 कोटी रुपये झाला. यामध्ये फ्लेक्सी कॅपमध्ये 7679 कोटी इन्फ्लो आला. ऑगस्टमध्ये ओपन एंडेड डेट म्युच्युअल फंडसमध्ये 7980 कोटी रुपयांचा ऊटफ्लो पाहायला मिळाला.एसआयपीद्वारे गुंतवणुकीचा पर्याय जोखीम युक्त असतो.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशितः 02 ऑक्टोबर 2025 11:30 दुपारी (आयएसटी)
Comments are closed.