10,000 च्या SIP नं 4.71 कोटी रुपयांची उभारणी,’या’ म्युच्युअल फंडचे गुंतवणूकदार मालामाल

SIP In Mutual Fund : गुंतवणुकीचा लोकप्रिय प्रकार म्हणून एसआयपीकडे पाहिलं जातं. अलीकडच्या काळात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भारतात काही म्युच्युअल फंड्सनी दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार रिटर्न दिले आहेत. सुंदरम म्युच्युअल फंडच्या सुंदरम मिडकॅप फंड सुरु होऊन 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. कंपनी जारी केलेल्या वक्तव्यानुसार जुलै 2002 मध्ये लाँच केलेल्या या योजनेनं वार्षिक 24.1 टक्के सीएजीआरनं परतावा दिला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारानं 2002 मध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर त्याची रक्कम 1.4 कोटी झाली होती. जर एखाद्या गुंतवणूकदारानं 23 वर्षांपासून 10 हजार रुपयांची एसआयपी सुरु ठेवली असती तर त्यांची गुंतवणूक 27.5 लाख असती. त्याचं मूल्य 4.71 कोटी रुपये असतं. यावर 20.7 टक्के एक्सआयआआर मिळाला असता.

गुंतवणुकीची रणनीती, नफा कमावण्याचा मंत्र

सुंदरम म्युच्युअलचे हेड ऑफ इक्विटीज भरत एस यांनी फंड यशस्वी होण्यामागील सर्वात मोठं कारण स्केलेबल ग्रोथ असणारे उद्योग, मजबूत नेतृत्व, चांगली आर्थिक स्थिती असणाऱ्या कंपन्यांमध्ये सातत्यानं गुंतवणूक करणं हे असल्याचं सांगितलं. कंपनीच्या मते सरासरी पेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना मार्क करण आणि त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणं फंडच्या यशस्वी होण्याचा मंत्र आहे.

कंपनीनं म्हटलं की हा फंड भारताची बदलती आणि संघटित होत असलेल्या अर्थव्यवस्थेनुसार हळू हळू आपली रणनीती बदलण्यात आला. मात्र त्याचा मूळ विचार मजबूत मिडकॅप कंपन्यांची ओळख आणि शिस्तबद्ध पोर्टफोलिओची निर्मिती सध्या जशीच्या तशी आहे. जोखीम उचलण्याबाबत हा फंड सतर्क होता.लिक्विडीटी, स्टॉकमध्ये एक्सपोझर मरियादा आणि पोर्टफोलिओ संतूलन सातत्यानं मॉनिटर केल्यानं अनिश्चित बाजाराच्या स्थितीत नुकसान मर्यादित करता आले.

AUM आणि नफ्याची आकडेवारी

30 जून 2025 पर्यंत Sundaram Asset Management Company ची AUM (असेट्स अंडर मॅनेजमेंट) रक्कम 73,405 कोटी रुपये होती. जर यांची उपकंपनी  Sundaram Alternate Assets Ltd (SAAL) चा समावेश केल्यास  AUM 80,463 कोटी रुपयांवर पोहोचते। आर्थिक वर्ष 2025- 26 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 45 कोटी  रुपये होता जो गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 16 कोटी रुपयांनी वाढला आहे.

Sundaram Finance बद्दल अधिक माहिती

Sundaram Asset Management ची  मूळ कंपनी Sundaram Finance ची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. आज ही कंपनी देशातील  नामांकित आणि विश्वसनीय कंपनी बनली आहे. ही कंपनी  कॉमर्शियल वाहने, कार, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज देते. यासह छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज, घर घरेदी करण्यासाठी कर्ज, विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक या क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीची देशात 700 हून अधिक कार्यालये आहेत. या कंपनीत 1 लाख लोक काम करतात . तर,5 लाख कर्जदार आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा

Comments are closed.