MVA was defeated in the assembly due to negligence Congress leader Nitin Raut clear opinion PPK
काँग्रेस नेते, आमदार नितीन राऊत यांनी मविआच्या पराभवावर थेटपणे भाष्य केले आहे. त्यांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. पण सहा महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यामुळे निवडणुकीच्या दोन महिन्यानंतर आता मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते, आमदार नितीन राऊत यांनी मविआच्या पराभवावर थेटपणे भाष्य केले आहे. त्यांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आम्ही गाफील राहिलो, असे राऊत यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (MVA was defeated in the assembly due to negligence Congress leader Nitin Raut clear opinion)
महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत आमदार नितीन राऊत यांनी भाष्य करत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आम्ही फक्त वाटाघातीत वेळ घालवला. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केले, अशी स्पष्ट कबुली नितीन राऊतांनी दिल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, लोकसभा निवडणुकीनंतरच्या आमच्या हालचाली लक्षात घेतल्या तर स्पष्ट दिसते की, आमचा वाद मुख्यमंत्रीपदासाठी होता. आम्ही वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करत राहिलो. ग्राऊंड लेव्हलला काय चित्र आहे, याकडे दुर्लक्ष करत आम्ही गाफील राहिलो. हे पराभवानंतर आम्हाला मान्य करावेच लागेल आणि ते मान्य केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
– Advertisement –
तसेच, मुख्यमंत्री होण्यसाठीच्या महत्त्वाकांक्षेमुळे आम्ही गाफील राहिलो, असेही यावेळी नितीन राऊतांनी मान्य करत म्हटले की, विधानसभा निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अनेकांच्या मुख्यमंत्री होण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षा बळावल्या होत्या, ज्यामुळे आम्ही गाफिल राहिलो. परंतु, आता काँग्रेसमध्ये लवकरच हाय कमांडकडून संघटनात्मक बदल केले जातील. विधिमंडळ पक्षनेता, विधानसभा गटनेता आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या तिन्ही पदांसाठी हाय कमांडकडून लवकर निर्णय होतील, अशी माहिती यावेली काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी दिली आहे. पण काँग्रेस नेत्यानेच पक्षाला आणि महाविकास आघाडीला घरचा आहेर दिल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावर महाविकास आघाडीतील इतर नेतेही आपले मत व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.
Comments are closed.