फडणवीस म्हणतात, माझी चाल कासवाची नाही!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माझी चाल कासवाची नाही, मात्र माझी प्रेरणा कासव आहे. जेव्हा माझ्यावर टीका होते, माझ्यावर दगड फेकले जातात, तेव्हा मी कासवाप्रमाणे माझ्या शेलमध्ये जातो. त्या टीकेकडे दुर्लक्ष करतो आणि आपले काम करत राहतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात टीका ऐकण्याची तयारीही ठेवावी लागत असल्याचे स्पष्ट केले.

बुट्टीबोरी औद्योगिक वसाहतीत आवाडा ग्रुप कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. मोठ्या पदावर गेल्यानंतर अनेकदा स्वतःबद्दल नकारात्मक किंवा चुकीचे काही ऐकण्याची तयारी माणूस ठेवत नाही. मात्र, आपण प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवतो. आपल्या चुका आणि चुकीचे निर्णय देखील जवळच्या लोकांनी आपल्याला सांगितले पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारमध्ये प्रत्येक गोष्ट चांगली चालते असं नाही

सरकारमध्ये प्रत्येक गोष्ट नेहमीच चांगली चालते असे नाही. त्यामुळे आम्ही सातत्याने फीडबॅक घेत असतो, असे फडणवीस म्हणाले.  दिवसभर भेटणारे नागरिक, राज्यात उद्योग उभारणारे उद्योजक तसेच पत्नी आणि मुलगी आपल्याला काम करण्यासाठी सातत्याने ऊर्जा देतात, असे फडणवीस म्हणाले.

Comments are closed.